मेहकर येथील दुःखद घटना ,
बुलडाणा ,
मेहकर शहरात आज घरकुल परिसरातील कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या खड्ड्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना दुःखदायक घटना जानेफळ रोडवर नव्याने बांधलेल्या घरकुल परिसरात आज सायंकाळी घडली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जानेफळ रोडवर असलेल्या इकरा नगरमधील 2 मुले आज17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता बेपत्ता झाली होती त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता सर्वत्र शोध घेतला जात असतांनाच चार वाजता घरकुल संकुलात बांधलेल्या खदानीत या दोन मुलांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्याने शहरात खळबळ उडाली आहे. घरकुल संकुलातील इकरा नगर येथे राहणारा अन्सार शेख छोटू हा शेखच्या घरी पत्नीला भेटण्यासाठी त्याचा मेहुणा आणि साडेचार वर्षांचा मुजैफ हे अकोला जिल्ह्यातील पातूर येथून आले होते. शेजारीच राहणारा शराफत खान यांचा मुलगा अमजद खान हा परतला, ही दोन्ही मुले सकाळी ९ वाजता लहान सायकल खेळत घराबाहेर पडली, असजद खान आणि मुझैफ अनेक तास परतले नाहीत, कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यांचा शोध न लागल्याने सर्वांनी सोशल मीडियावर हरवलेल्या मुलाची पोस्ट टाकून शोध सुरू केला, मात्र त्यांचा शोध लागला नाही ,
नवहता . मात्र कपडे धुवायला गेलेल्या काही महिलांना बेपत्ता बालकांचे मृतदेह पाण्यावर आढळल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून दुःख वयक्त केले जात आहे.