प्रतिनिधी ( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा :-तायकांडो असोसिएशन ऑफ मेहकर यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जूनियर आणि सीनियर चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये देऊळगाव राजा येथील स्पोर्ट अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी पटकावली दोन सुवर्ण एक सिल्वर आणि एक ब्राँझ मेडल
नुकतीच दिनांक 16 नोव्हेंबर मंगळवार ला बुलढाणा जिल्हा येथे तायकांडो असोशियन ऑफ मेहकर यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय तायकांडो चॅम्पियनशिप 2021 22 सीनियर आणि ज्युनियर चॅम्पियन शिप मध्ये राजेश खांडेभराड सर याच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा येथील स्पोर्ट अकॅडमी चे विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत ओपन मध्ये गौरव रायलकर यांनी गोल्ड मेडल अंडर फोर्टीन मध्ये आचल कव्हळे हिने गोल्ड मेडल अंडर नाईन्टीन मध्ये अक्षय कवळे सिल्वर मेडल आणि अंडर सेव्हन्टीन मध्ये अभिषेक चव्हाण याने ब्राँझ मेडल पटकावले या स्पर्धेमध्ये खेळलेल्या सीनियर विद्यार्थ्यांची निवड पालघर येथील होणाऱ्या राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेसाठी होणार आहे त्यामध्ये गौरव रायलकर या सीनियर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे