Home बुलडाणा देऊळगाव राजा पोलीस स्टेशन तर्फे व्यापाऱ्यांना आवाहन

देऊळगाव राजा पोलीस स्टेशन तर्फे व्यापाऱ्यांना आवाहन

810

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:-तर्फे देऊळगाव राजा शहरातील सर्व व्यापारी बंधूंना जाहीर आवाहन करण्यात येते की.
1) आपल्या दुकानात व दुकानाबाहेर C. C. T. V. लावुन घ्यावे.व ज्यांनी यापूर्वी लावले आहेत ते कार्यान्वित आहे याची खात्री करून घ्यावी.
2) सर्व व्यापारी बंधूनी आपली दुकाने वेळेवर बंद करावी.
रात्री उशीरा पर्यन दुकाने चालू ठेऊ नयेत .
3) दुकानात काम करणारे इसम व दुकान मालक हे दुकान
बंद होईपर्यंत दुकानान थांबतील व एकाच वेळी दुकानाच्या बाहेर पडतील.
4)दुकान मालक ह्यांनी दुकान बंद केल्यावर एकटे घरी जाऊ नये सोबत कोणीतरी असावे.
5)दिवसभरात दुकानात जमा होणारी रक्कम संध्याकाळीच
सुरक्षीत ठीकाणी जमा करावी
6)कोणत्याही परिस्थितीत दुकान मालक रात्री दुकान बंद
करतेवेळी एकटे दुकानात राहणार नाही.
7)रात्रीच्या वेळी बाजार पट्ट्यातील दुकानदार ह्यांनी
काही दुकानदार ह्यांचा ग्रुप तयार करून सुरक्षा रक्षक
नेमावा ( 25 दुकानदारांचा एक ग्रुप) जेणेकरून रात्री
दुकान फोडी घटनेवर आळा बसेल.

पोलीस निरीक्षक (जयवंत सातव)
देऊळगाव राजा पोलीस स्टेशन