Home बुलडाणा ह भ प राजेंद्र महाराज तळेकर (संपर्क प्रमुख महाराष्ट्र वारकरी महामंडळ बुलढाणा...

ह भ प राजेंद्र महाराज तळेकर (संपर्क प्रमुख महाराष्ट्र वारकरी महामंडळ बुलढाणा जिल्हा )यांचा वारकरी सेवा सन्मान या मानाच्या पुरस्काराने श्री क्षेत्र पंढरपूर येथे सन्मान

330

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा :-ह भ प गुरुवर्य बाबुराव महाराज वाघ यांचा मठ या ठिकाणी कार्तिकी एकादशी चे दिवसी ह भ प राजेंद्र महाराज तळेकर यांचा वारकरी सेवा सन्मान हा मानाचा महाराष्ट्र भर सर्व ज्ञात झालेला सन्मान गुरुवर्य ह भ प बाबुराव महाराज वाघ यांचे हस्ते प्राप्त झाला वाघ महाराज हे महाराष्ट्र भर नाव असलेलं साधक व्यक्तिमत्व ,महाराष्ट्रातील एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व संत साहित्याचे गाढे अभ्यासक विचारवंत ते स्वतःहून हा सन्मान देव ,देश,धर्माचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा करतात ..या सोहळ्याला उपस्थिती लाभली ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री (संस्थापक अध्यक्ष ,वारकरी प्रबोधन महसमिती मुंबई ,कार्य अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ महाराष्ट्र )तसेच ह भ प रामचंद्र महाराज पेनोरे ,ह भ प बळवंत महाराज आवटे ,ह भ प गजानन महाराज शास्त्री ,धर्मनिष्ठ पंजाब राव महाराज ,महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा शाखेचे विदर्भ अध्यक्ष ह भ प किरण महाराज शिंदे ह भ प बाहे कर काका ,इंगळे बापू ,राठोड बाबा ,लोखंडे महाराज व बराच जनसमुदाय उपस्थित होता .ह्या सोहळ्याने सर्व भक्त व वारकरी बांधवांमध्ये आनंद दिसून आला.