तळेगांव पोलिसांनी केली कारवाई
इकबाल शेख
वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- तळेगाव आर्वी रोडवरील वर्धमनेरी नजीकच्या चप्पल कंपनीच्या परिसरातुन राॅ मटेरीयल चोरून नेल्याची तक्रार तळेगांव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरट्यांना अवघ्या चार तासात अटक करून १८७५०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला.
याप्रकरणी फिर्यादी नामे रिजवान हुसेन शब्बीर हुसेन वय 34 वर्ष व्यवसाय मॅनेजर वननेस्पोली कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वर्धमनेरी रा. आर्वी यांनी तळेगाव पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार 20/11/21 चे 18-00 वा ते 21/11/21 चे 12-30 वा दरम्यान वननेस्पोली कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वर्धमनेरी येथील कंपनीचे मागील बाजूस ठेवलेले माल- जुने चप्पल व बूट चे रॉ मटेरियल अंदाजे 75 किलो वजनाचे किंमत प्रति किलो 250/- रू प्रमाणे 18750/- रू चे मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान कंपनीचे कामगार व गुप्त बातमी दारा करून मिळालेले खात्रीशीर माहितीवरून तळेगांव पोलीस आरोपींच्या शोधात निघाले असता तळेगांव च्या अमरावती रोडवरील जयस्तंभ जवळ एक कुटुंब अतिक्रमण करून राहत असल्याचे माहिती पडले व संशयास्पद आरोपी हे त्याचं ठिकाणी असल्याचे माहिती पडल्याने पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता संबंधित तीनही आरोपी घरी मिळून आले , पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेतली असता चोरलेला मुद्देमाल घराच्या मागच्या बाजूस मिळून आला.त्यांतील आरोपी 1) फिरोज खान अब्दुल्ला खान वय 19 वर्ष 2) नियाजुद्दीन महेमुद्दीन शेख वय 26 वर्ष दोन्ही रा. वार्ड क्रमांक 1 मिरची प्लॉट वरुड जिल्हा अमरावती, ह.मु वार्ड क्रमांक 1 रामदरा तळेगाव (शा. पंत) जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणून अटक केली,
मिळालेला मुद्देमाल 1) जुने चप्पल व बूट चे रॉ मटेरियल अंदाजे 75 किलो वजनाचे किंमत प्रति किलो 250/- रू प्रमाणे 18750/- रू 2) गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल क्रमांक MH 40 R 4815 जुनी वापरती 3) गुन्ह्यात वापरलेली तीन चाकी मालवाहू मोटर सायकल विना क्रमांकाची जप्त केली.
सदरची कार्यवाही ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा,पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार संदीप महाकाळकर, रमेश परबत , देवेंद्र गुजर यांनी केली.