यवतमाळ दि. 23 (जिमाका) : पालकमंत्री संदिपान भुमरे हे 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
23 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन,राखीव व मुक्काम. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,यवतमाळ येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,अधिष्ठाता व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी 10.30 वाजता कोविड परिस्थीती व लसीकरणबाबत जिल्हा नियोजन सभागृह येथे आढावा बैठक. सकाळी 11 वाजता यवतमाळ शहर वाढीव पाणी पुरवठा योजना व भूमीगत गटार योजनेबाबत जिल्हा नियोजन सभागृह येथे आढावा. सकाळी 11.30 वाजता जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती व सिंचन प्रकल्पावरील कालवे सल्लागार समितीच्या बैठकीस जिल्हा नियोजन सभागृह येथे उपस्थिती. दुपारी 12 वाजता कोविड-19 साथरोगामुळे अनाथ झालेल्या बालकांना व विधवा झालेल्या महिलांना जिल्हा नियोजन सभागृह येथे अर्थसहाय्याचे वितरण. दुपारी 12.45 वाजता भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिका शुभारंभ प्रसंगी उपस्थिती व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यशस्वी ठरलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांचा सत्कार. दुपारी 1.30 वाजता रेमंड कंपनीचे विश्रामगृह यवतमाळ येथे अगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत करतील. सायंकाळी 6.30 वाजता. रेमंड कंपनीचे विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व मुक्काम.
25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता रेमंड कंपनीचे विश्रामगृह येथून प्रयास वन, गोधणी रोडकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता प्रयास वन येथील राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते होणाऱ्या वृक्षारोपन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.25 वाजता मातोश्री सभागृह यवतमाळ येथे आगमन. सकाळी 9.30 वाजता प्रेरणास्थळ येथे होणाऱ्या प्रार्थना व वृक्षारोपन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता जवाहरलाल दर्डा इंग्लीश मेडीयम स्कुल व मातोश्री सभागृह येथील आरोग्य शिबीराच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 2 वाजता दर्डा उद्यान येथून हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रस्थान प्रसंगी उपस्थिती. दुपारी 2.50 वाजता. रेमंड कंपनीचे विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगर परिषद यवतमाळ हद्दीतील मौजा यवतमाळ येथील प्रभाग क्र. 2 मध्ये रमाई पार्क येथील काँक्रीट नाली व रस्ता बांधकामाचे उद्घाटन. सकाळी 10 वाजता यवतमाळ शहर प्रभाग क्रमांक 16 मधील शिवनेरी सोसायटी येथील काँक्रीट नालीचे बांधकाम व सिंघानिया नगर येथील काँक्रीट नाली बांधकामाचे उद्घाटन. सकाळी 10.30 वाजता यवतमाळ शहर प्रभाग क्रमांक 18 येथे रस्ता डांबरीकरणाचे उद्घाटन. सकाळी 11 वाजता यवतमाळ शहर प्रभाग क्रमांक 24 वडगाव येथील रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन. दुपारी 12 वाजता रेमंड कंपनीचे विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता यवतमाळ येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.