Home विदर्भ ST च्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; तुर्तास विलीनीकरण नाही- अनिल परब

ST च्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; तुर्तास विलीनीकरण नाही- अनिल परब

147

मनीष गुडधे

अमरावती – अनेक दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती (ST workers मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय -strike) तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) ते सध्या ऍडमिट असणाऱ्या रिलायन्स हॉस्पिटल मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत चर्चा केली. यानंतर अनिल परब यांनी सहयाद्री अतिथीगृहावरती ,मंत्री उदय सामंत, आ. गोपीचंद पडळकर, एस टी कामगार शिष्टमंडळ यांच्यातदेखील एक बैठक पार पडली. आणि त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी आजच्या दिवसभरात केलेल्या चर्चांनंतर घेतलेले निर्णय सांगितले.ते म्हणाले ‘गेल्या 15 दिवस एस टी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपामध्ये त्यांची एकच प्रमुख मागणी होती की परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्यसरकार मध्ये विलीनीकरण करावे. याबाबत उच्च न्यायायलाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये विलीनीकरणाबाबतचा अहवाल न्यायालयाला द्यावा. असा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच ही समिती जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करु; अशी भूमिका सरकारने यापुर्वीच मान्य केली होती.’ मात्र हा संप दिवसेंदिवस वाढत असल्याने आणि शाळकरी विद्यार्थ्यांची जी अडचण निर्माण झाली होती त्याबाबत काय निर्णय घ्यायचा याचाच आम्ही विचार करत होतो. आणि या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी आज बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून ती पगारवाढ ST च्या इतिहासामधील सर्वात मोठी पगारवाढ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलें. पगार दहा तारखेच्या आतच होणार -…………………………तसेच एसटी कर्मचाऱ्यांना घरभाडे, भत्ता, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात येणार आहे. तसेच जे कर्मचारी 1 ते 10 वर्ष सेवेत आहेत त्यांच्या मूळ वेतनात 5 हजार वाढ करणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये साधारण 7 हजाराची वाढ करणार असल्याचेही परब यांनी यावेळी सांगितले . दरम्यान 41 टक्क्यांची पगारवाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. एसटी च्या इतिहासात सर्वात मोठी वाढ होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शिवाय कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर राखत ही पगारवाढ करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दहा तारखेच्या पुढे जाणार नाही तो 10 तारखेच्या आतच होईल याची हमी राज्यसरकाने घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.