7 दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्याचे आदेश ,
भगवानराव साळवे ,
सिंदखेडराजा ,
मलकापूर पांग्रा बस स्थानक वरील शेंदुर्जन दुसरबीड आणि अंढेरा महामार्गावरील अनाधिकृत अतिक्रमण धारकांना नोटिसा 7 दिवसात अतिक्रमण काढा अन्यथा आम्ही हातोडा चालवू साबावी इशारा सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा बसस्थानक परिसरात दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून रस्त्याच्या दुतर्फा 64 फूट आतील अतिक्रमण 7 दिवसाच्या आत काढून घ्या अन्यथा पोलीस बंदोबसतात अतिक्रमनावर हातोडा चालविल्या जाईल आणि त्याचा खर्च अतिक्रमण धारकाकडून वसूल करण्यात येईल असा इशारा नोटीस मध्ये दिला असल्याने बस स्थानक परिसर मोकळा श्वास घेणार असून सुमारे 80 अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या आहेत
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या मार्गाची देखरेख आहे. त्या अनुषंगाने रस्त्याच्या मध्यापासून 32 फूट उजव्या बाजूला आणि 32 फूट डाव्या बाजूच्या हद्दीतील टपरी, शेड, बांधकाम तसेच मुरूम भराव देखील नोटीस मिळाल्याच्या ७ दिवसात पूर्ण दा काढून घेण्याचे अतिक्रमणधारकांना सांगण्यात आले आहे. यामार्गावरील अतिक्रमण निघणार असल्याने रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. या ठिकाणी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते अनेक वेळेस याठिकाणी छोटे-मोठे अपघात होतात त्यामुळे मलकापूर पांग्रा बस स्थानक परिसरातील अंढेरा आणि शेंदर्जन दुसरबीड रस्त्यावर अतिक्रमण काढणे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिल्यामुळे या रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण निघणार आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडीचा प्रश्न मिटणार असून वाहनधारकांमध्ये आनंद निर्माण होत आहे