घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना- भरधाव कारने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना अंबड तालुक्यातील शहापुर येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत माहिती अशी की,सायगाव ता.बदनापुर येथील बंडु शिंदे (वय ५५ वर्षे) व त्यांच्या पत्नी सखुबाई बंडु शिंदे (वय ५० वर्षे) हे शहापुर येथील त्यांच्या नातेवाईकांकडे घर भरणीच्या कार्यक्रमासाठी आले होते.कार्यक्रम आटोपून सदर दांपत्य हे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असता जालन्याकडुन बिडच्या दिशेने भरधाव जाणारी कार क्रमांक एम.एच ४३ एक्स ८३६१ या कारने मोटारसायकलीस जोरदार धडक दिली.
यात सखुबाई बंडु शिंदे (वय ५० वर्षे) ह्या जागीच ठार तर बंडु शिंदे (वय ५५ वर्षे)हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी तत्काल अंबड येथे हलविण्यात आले आहे.अपघात झाल्यानंतर कार चालक हा घटनास्थळावरून पसार झाला असता नातेवाईकांनी पाठलाग करून धाकलगाव येथे पकडुन कार चालकास पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.
हा अपघात घडल्यानंतर २ तासानंतर हि पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जालना बीड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्याने राष्ट्रीय महामार्गावर तब्बल ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.त्यानंतर गोंदि पोलिस स्टेशन )चे पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ,उपनिरीक्षक गजानन कौळासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतुक सुरळित करून सदर घटनेचा पंचनामा केला.