पालकांनो लहान मुलांना मोबाईल देऊ नका
अमीन शाह
कधी कधी अश्या घटना घडतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते आजच्या या ऑनलाईन च्या काळात सर्वच काही ऑनलाईन झालं आहे लहान मुलांच्या हाती ही अँड्रॉइड मोबाईल आले आहेत मोबाईल मुळे लहान मुलांच्या बुद्धीवर याचे विपरीत परिणाम होत आहे
आज पिंपरी-चिंचवडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून पालकांना चिंतेत टाकणारी आहे. अवघ्या १२ वर्षीय मुलाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप १२ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले नाही. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय मुलगा हा पीडित ४ वर्षीय चिमुकलीच्या शेजारीच राहण्यास आहे. शेजारी असल्याने मुलाला पीडित मुलीच्या घरातील सर्व व्यक्ती ओळखत होते. दरम्यान, मुलाच्या घरी कोणी नसताना ४ वर्षीय चिमुकलीला त्याने घरी आणले, मुलाने चॉकलेट आणण्यास पैसे देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले अस तक्रारीत म्हटलं आहे. अत्याचार करत असताना मुलाला पीडित मुलीच्या आईने पकडले अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. या गंभीर घटनेमुळे पालक चिंतेत होते. अखेर पोलिसात तक्रार द्यायची अस पीडित मुलीच्या आईने ठरवले. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप मुलाला ताब्यात घेण्यात आले नाही.