केंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांमुळे जनतेला सोसावा लागत आहे महागाईचा फटका – कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अनिरुद्धजी उर्फ बबलूभाऊ देशमुख
मनिष गुडधे – अमरावती
जनतेला फसवे आश्वासने देऊन मोदींनी सत्ता हस्तगत केली – सभापती विक्रम ठाकरे
पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूची महागाई कमी करण्याकरिता लोणी येथे आयोजित वरुड तालुका कॉंग्रेसच्या जन जागरण अभियानात नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जन जागरण अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पेट्रोल, डीझेल व जीवनावश्यक वस्तूची महागाई कमी करण्याकरिता वरुड तालुका कॉंग्रेस द्वारा लोणी येथे “जन जागरण अभियान” शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी राबविण्यात आले. लोणी येथे वरुड तालुका कॉंग्रेस द्वारा आयोजित या जन जागरण अभियानात लोणी व पंचक्रोशीतील तसेच वरुड व मोर्शी तालुक्यातील नागरिकांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला.
वरुड तालुका कॉंग्रेस द्वारा लोणी येथील श्रीकृष्ण मंदिर येथून ते गुजरी बाजार, लोणी पर्यंत भव्य अशा रॅली चे आयोजन करण्यात आले. त्यानंतर लोणी येथील गुजरी बाजार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर, दर्यापूर चे आमदार बळवंतराव वानखडे, अमरावती जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्धजी उर्फ बबलूभाऊ देशमुख, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव तथा वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांनी या सभेला संबोधित केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून आपले वक्तव्य व्यक्त केले. खोटं बोला पण रेटून बोला हा मोदी सरकारचा बाणा असून खोटी प्रलोभने देण्याचेच काम मोदी सरकारने केले आतापर्यंत केले आहे, असे जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले. केंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांमुळे जनतेला महागाईचा फटका सोसावा लागत आहे आहे असे अमरावती जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्धजी उर्फ बबलूभाऊ देशमुख यांनी आपल्या भाषणातून सांगितले तसेच अन्य बाबींवर देखील त्यांनी प्रकाश टाकला. युवकांच्या रोजगारसंबंधी, नोटबंदीमुळे झालेल्या संत्रा बागायतदारांच्या नुकसानीवर, पेट्रोल – डीझेल, गॅस सिलेंडर च्या दरवाढी संदर्भात, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी संदर्भात अशा एक न अनेक विषयांवर बोलून मोदींनी जनतेला फसवे आश्वासने देऊन सत्ता हस्तगत केली असे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव तथा वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांनी यावेळी आपले मत व्यक्त करून “सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे हे जन – जागरण अभियान” आहे, असे यावेळी सांगितले.
यावेळी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर, दर्यापूर चे आमदार बळवंतराव वानखडे, अमरावती जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्धजी उर्फ बबलूभाऊ देशमुख, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, मोर्शी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे उपाध्यक्ष नरेशचंद्रजी ठाकरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयारामजी काळे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव तथा वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, विनोदराव पवार, संजयभाऊ बेलोकार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वरराव दाभाडे, प्रकाशराव काळबांडे, वरुड तालुका कॉंगेसचे अध्यक्ष बाबारावजी बहुरूपी, जिल्हा परिषदेचे सदस्य, महेंद्रभाऊ गहरवाल, राजेंद्रजी पाटील, सौ.सिमाताई सोरगे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रशेखरजी अळसपुरे, पंचायत समिती सदस्य तुषारभाऊ निकम, सौ.सिंधुताई करणाके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ नागमोते, खरेदी विक्री संघचे अध्यक्ष राजेंद्रजी पाटील, लोणी ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ.अश्विनीताई दवंडे, उपसरपंच रविभाऊ तिखे, डॉ.अरुणराव लोखंडे तसेच लोणी व पंचक्रोशीतील तसेच वरुड व मोर्शी तालुक्यातील नागरिक, वरुड तालुका कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, सेवादल कॉंग्रेस, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल, अनुसूचित जाती विभाग चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.