प्रतिनिधी-प्रमोद झिले,येरला हिंगणघाट
वर्धा – गेल्या तीन चार वर्षा पासून शेतकरी संजय कवडुजी वाघमारे.रा. मारडा,त.समुद्रपुर जि.वर्धा.येथील रहीवासी यांच्या शेतात कालव्याच्या पाण्या मुळे सतत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.त्यामुळे त्यांना लाखो रुपयाचं नुकसान होत होत..शेतातील गौळ लघु कालवा क्र.एक वरुन मागील चार वर्षापासुन कालव्याच्या पाण्यामुळे दोन एकर जमीनीतील पिकाचे नुकसान होत होते,याची तक्रार सिचंन विभागाला वारंवार देऊन सुध्दा काम होत नव्हते.मागील काही दिवसांअगोदर शेतकरी संजय वाघमारे यांनी राहुल भाऊ चौधरी यांच्या सोबत गजुभाऊ कुबडे यांना भेटुन त्यांना संपूर्ण समस्या समजून सांगीतली त्यानंतर त्यांच्या अथक परीश्रमाने त्यांच्या तक्रारीचे निराकरण झाले या संदर्भात रुग्णमित्र-गजुभाऊ कुबडे यांनी या तक्रारीचा सतत ज्युनियर इंजिनियर वाघ साहेब विभागाचे कार्यकारी अभियंता ढूमने साहेब नागपूर यांच्या कडे सतत पाठपुरावा केला रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांच्या पाठपुरावठ्याची दखल घेत दोन दिवसा आधी या गौळ लघु कालव्याच्या दुरुस्तीचे काम मोठ्या लाघाबघिने सुरू झाले असून यामुळे शेतकरी संजय वाघमारे व या कालव्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या साठी शेतकरी संजय वाघमारे आणी त्यांच्या संपूर्ण कुंटुबाने सर्व शेतकरी बंधूनी गजुभाऊ कुबडेचे आभार व्यक्त केले.