Home उत्तर महाराष्ट्र Jagatik एड्स दिनानिमित्ताने स्नेहालय’ची जाणीव जागृती रॅली

Jagatik एड्स दिनानिमित्ताने स्नेहालय’ची जाणीव जागृती रॅली

334

अहमदनगर / जामखेड दि.०१ डिसेंबर २०२१ आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणाईने एच.आय.व्ही./एड्स यांवर पथदर्शी अधिक काम करून चर्चा घडवून आणून आरोग्य विषयी भारतीय नागरिकांच्या मनामध्ये नवा राष्ट्रनिर्माणाचा दृष्टीकोन निर्माण करण्याचे काम करावे असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी केले.

जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहानिमित्त स्नेहालय-स्नेहसक्षम प्रकल्प,१७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. विभाग जामखेड आणि दिशा एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात काढण्यात आलेल्या एच.आय.व्ही./एड्स रॅली’ला संबोधीत करतांना ते बोलत होते.यावेळी तहसीलदार योगेश चंदरे,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारी,प्राचार्य विकी घायतडक,प्राचार्य अनिवाश फलके,प्राचार्य बी.के.मडके,

मा.प्राचार्य अनंता खेत्रे,प्राचार्य श्रीकांत होसिंग,श्याम जाधवर, ऍड.पी.के.कात्रजकर, प्रा.अडसुळ,प्रा.मुकुंद राऊत, एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.गौतम केळकर,प्रा.मयुर भोसले,प्रा.अनिल देडे,
प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत स्नेहालयचे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले म्हणाले की; एच.आय.व्ही./एड्स बाबत तरुणांईमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक आहे.त्यासाठी स्नेहालय व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांच्या माध्यमातून “होऊया सारे एकसंघ,करूया एच.आय.व्ही चा प्रतिबंध” हे ब्रीद घेऊन गेल्या तीन दशकांपासून स्नेहालय यावर जनजागृती करत आहे.महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर एक पथदर्शी काम स्नेहालय’ने उभे केले आहे.एच.आय.व्ही.एड्स’चा प्रसार रोखण्यासाठी अतिजोखिमचे वर्तन असणारे भागांमध्ये जाणीव जागृतीचे काम करते आहे.महिला,बालकांच्या आणि संसर्गित व्यक्तींच्या अधिकारांच्या प्रश्नांवर स्नेहालय नेहमीच आग्रही भूमिका घेते.एच.आय.व्ही.चा समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिकाधिक तरुणांईने पुढे यायला हवे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पुढे बोलतांना न्यायाधीश जगताप म्हणाले की; जगाचा विचार करता एच.आय.व्ही./एड्स संसर्गित व्यक्तींची आकडेवारीनुसार १९९० ते २००० या दशकात या महारोगाने थैमान घातले होते.एड्स आळा घालण्यासाठी प्रतिबंध आणि लोकांमध्ये जनजागृती हाच मार्ग आहे.आजच्या इंटरनेट च्या महाजालात तरुणाईने वाहवत न जाता त्याचा उपयोग समाजहितासाठी करावा. स्नेहालय संस्थेने यावर पथदर्शी काम उभे केले आहे तरुणाईने याचा आदर्श घेऊन जाणीव जागृतीच्या या कामात स्वतःला झोकून देऊन या विधायक कार्यात सहभागी व्हायला हवे असे ते म्हणाले.यावेळी स्नेहालयाच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांना एड्स प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रॅली’ला हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली.या रॅलीत क्षेत्रिय अधिकारी मजहर खान,
आय.सी.टी.सी.चे श्याम जाधवर,राजेश मिश्रा,जामखेड महाविद्यालयाचे एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.गौतम केळकर,प्रा.मयुर भोसले,प्रा.अनिल देडे,डॉ.शशांक शिंदे,सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद,नागेशविद्यालयाचे, जामखेड महाविद्यालाय,ल.ना.होशिंग विद्यालयाचे सर्व विध्यार्थी-विध्यार्थिनींसह एन.सी.सी.कॅडेट,आशा स्वयं सेविका,गतप्रवर्तक,तसेच इतर स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.सी.सी.विभाग,मोहित कदम,यांनी विशेष परिश्रम घेतले..या उपक्रमाचे १७ महाराष्ट्र बटालियन चे कमांडीग ऑफिसर जीवन झेंडे यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश अब्दुले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.तुकाराम घोगरदरे यांनी केले.