किट्टी आडगांव / सुशांत आगे
बिड – दिवाळीपासून सुरु असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपता सपत नाहीय. त्यातच शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचेही हाल होत आहेत. बस बंद असल्याचा फटका ग्रामीण भागाला जास्त बसतोय.
राज्य शासनात विलीनीकरणासाठी सध्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामुळे लहान मोठ्यांसह सर्वच प्रवाशांचे हाल होत आहेत. या संपाचा फटका अनेकांना बसत असून ग्रामीण पातळीवर गंभीर परिणामही पहायला मिळत आहेत. संपाचे परिणाम दाखवणारे माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगांव गावातील विद्यार्थ्यांचे टॕक्टर च्या ट्रेलर मधून प्रवास करतांना टिपलेले हे बोलके चित्र. दिवाळीच्या सुट्यांनतर शाळा सुरु झाल्या. माळेवाडी,पुरूषोत्तमपुरी,वाघोरा,महात्तपुरी,राजेगांव,सुर्डी सह अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी किट्टी आडगांव येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात येतात. एरवी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी एसटी बसचा वापर करतात. मात्र सध्या एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. कोणत्याही प्रकारच्या वाहनांनी अशा प्रकारे प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे आता तरी हा संप, यातील राजकारण थांबावं, अशी लोकभावना आहे.
[ टॕक्टर च्या ट्रेलर मध्ये ४० ते ५० विद्यार्थी ]
एसटी बस सुरु नसल्याने गावोगावच्या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. गुरूवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी फारशी वाहने नव्हती. उशीर होत असल्याने एका टॕक्टर च्या ट्रेलर मध्ये ४० ते ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी दाटीवाटीने उभे होते .
[ महाराष्ट्र शासनाच्या तिघाडी सरकारने तात्काळ बस कर्मचाऱ्यांचे मागण्या पुर्ण कराव्यात जेणे करून बाहेर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी होळसांड थांबेन व होणारे हाल होणार नाहीत.
विष्णूपंथ आगे,भाजप नेते ]