Home जळगाव प्रेमसंबंध असल्याचे नवऱ्याला सांगितल्यावर फारकत आणि प्रियकराने लग्नाला नकार दिले

प्रेमसंबंध असल्याचे नवऱ्याला सांगितल्यावर फारकत आणि प्रियकराने लग्नाला नकार दिले

266

जळगाव (एजाज़ गुलाब शाह) शहरातील रहिवाशी असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत सलग १९ महिने अत्याचार करणाऱ्या आरोपीवर आज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे , विशेष म्हणजे आपले या मुलीशी प्रेमसंबंध आहेत अशी माहिती या आरोपीने मुलीच्या पतीला दिल्यावर त्यांचा घटस्फोट झाला होता. फिर्यादी मुलीचा घटस्फोट झाल्यावर या आरोपीने लग्नाला नकार दिला .

जळगाव शहरात फिर्यादी मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे काही वर्षांपूर्वी हे कुटुंब एरंडोलला राहत होते . जळगावात ते ३ वर्षांपासून राहत आहेत . २ वर्षांपूर्वी या मुलीची आरोपी हसन असलम मोमीन ( रा – एरंडोल ) सोबत ओळख झाली . त्याने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला आणि तिला लग्नाची मागणी घातली . त्यांनंतर माझे आई – वडील लग्नाला तयार नाहीत तरीही मी तुझ्याशीच लग्न करिन पण २ वर्षे वेळ लागेल असे तो सांगत होता असे आश्वासन त्याने फिर्यादी मुलीच्या आई- वडिलांनाही दिले होते . दरम्यानच्या काळात मुलीच्या आई वडिलांनी तिचे लग्न सुरत येथील मुलाशी करून टाकले . मात्र ती अल्पवयीन असल्याने काही काळ आई वडिलांकडे राहील यासाठी तिच्या नवऱ्याचीही संमती होती . त्यामुळे फिर्यादी मुलगी माहेरी राहत होती . याच काळात आरोपीने फिर्यादी मुलीच्या नवऱ्याला कॉल करून आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्याने त्या दोघांचा घटस्फोट झाला होता . घटस्फोटानंतर मुलीच्या आई – वडिलांनी विचारणा केल्यावर आरोपीने लग्नाला नकार दिला .