मेरा चौकी फाट्यावरील घटना,
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भाविकांचे वाहन रस्त्यातच झाले पलटी
हनिफ शेख
मेरा खुर्द ,
पंढरपुर येथून देवदर्शन करून घराकडे परत जाणार्या भाविकांच्या वाहनावरील चालकाला झोपेचा डोळका लागल्यामुळे नियंत्रण सुटल्याने वाहन ज्या दिशेने जात होते त्या उलट झाले व चार हि चाके उरती झाली होती दे राजा कडुन जळगाव जामोद जात असताना डीवाईडर वरून 407 दुसऱ्या दिशेला गेले त्याच वेळी ड्रायव्हरने स्टेरिंग काढल्यामुळे भाविकांचा 407 भर रस्त्यात उलटे झाले यावेळी निरव वासियांनी भाविकांसाठी भरपूर मदत केली.शेख जाहेद.हरूण शाह मुकेश लाहने इर्शाद शाह पप्पू गवई यांनी स्वतःच्या वाहनांमध्ये भाविकांना दवाखान्यात नेले. रस्त्यातचे आहे. या अपघातात ३८ भाविक जखमी झाले असून काहीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना आज ७ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चिखली देऊळगावराजा मार्गावरील मेरा चौकी फाट्याजवळ घडली.
जळगाव जामोद तालुक्यातील खांडवीसह विविध गावातील ४८ भाविक हे पंढरपुर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून ते चिखली मार्गे आपल्या गावी खांडवीकडे एम.एच. ०४/ जी / ८४१३ या क्रमांकाच्या मेटॅडोरने जात होते. दरम्यान मेरा चौकी फाट्याजवळ येताच वाहना वरील चालकाचे नियत्रंण सुटल्यामुळे मेटॅडोअर रस्त्यातच पलटी झाला. अपघात घडताच भाविक महिलांनी एकच आरडओरडा करण्यास सुरूवात केली. या अपघातात सखुबाई गजानन सोनोने, कन्यावती रामेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वरी सारंगधर इंगळे, सुरेखा विनय महाजन, ताई श्रीकृष्ण धोरण, दशरथ शालीग्राम वाकोडकर, गजानन मधुकर तायडे, अर्चना गजानन तायडे, शारदा विकास गणेशे, त्रिगुणा हरिचंद्र काटे, मनिषा संतोष काटे, गिता शिवाजी काटे, पंचफुला विठ्ठल यादगिरे, पुष्पा यादगीरे, सुशिला थोरात, कुसूम खारोडे, केसर वरजे, अशोक महाले यांच्यासह ३८ भाविक जखमी झाले आहेत. जखमी मध्ये महिला भाविकांचा समावेश आहे. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारर्थ भरती केले. परंतु जखमी पैकी पंधरा भाविकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रकरणी पोलीसांनी वाहन चालकां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर करीत आहेत.