यवतमाळ दि. 07 डिसेंबर (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून यवतमाळ जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहिती, पर्यटन स्थळे, प्राचीन मंदिरे, अभयारण्य तसेच येथील साहित्यिक, कलावंतांची माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी माहिती व जनसंपर्कच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माहिती सहायक गजानन जाधव, वरिष्ठ लिपीक सचिन उईके, शितल गोधणे, नरेंद्र गावंडे, वनिता नेवारे इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .