Home विदर्भ पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा – न्युज मिडीया पत्रकार...

पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा – न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन ची मागणी

105

वणी /प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पुसद येथील दोन पत्रकार बंधूंवर वार्तांकन करीत असतांना जमावाने भ्याड हल्ला चढवित जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या जवळील साहित्य बळजबरीने लुटले. या घटनेचा जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ, यांना उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो प्रत्येक घटनेचे वार्तांकन निर्भीड व निष्पक्षपणे तो समाज व शासन तसेच प्रशासनासमोर मांडत असतो अशातच अतिसंवेदनशील भागात जाऊन व आपला जीव मुठीत घेऊन पत्रकारिता करित असतो मात्र सद्या पत्रकार असुरक्षित असल्याची भावना पुन्हा निर्माण झाली. मागील घटने प्रमाणे पुन्हा शुक्रवारी काळी दौलत खान येथे झालेल्या पत्रकारांवरील भ्याड हल्ल्यामुळे पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पुसद येथील जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदेश कान्हु आणि मुकाबला न्यूज-24 चे प्रतिनिधी अँकर सैय्यद फैजान यांच्यावर काळी दौलत खान येथे हल्लेखोरांनी शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर ला रात्री अंदाजे आठ वाजता च्या सुमारास ३० ते ४० अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढविला तसेच पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात हल्लेखोरांनी पत्रकारांजवळील संपूर्ण साहित्य रोख रकमेसह अंदाजे ८० हजार रुपये पर्यंतचा मुद्देमाल बळजबरीने लुटण्यात आला आहे. सदर घटना ही जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री दिलीप-पाटील भुजबळ, मा उपविभागीय अधिकारी श्री सावन कुमार, तसेच पोलीस प्रशासनातील अनेक कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांच्या सह पुसद येथील आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांच्या समोर घडली हे विशेष. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनासमोर जर चौथ्या आधार स्तंभावर हल्ला झाला आहे ही अतिशय निंदनीय बाब आहे. अशा घटना वारंवार घडू नये. या घटनेतील हल्लेखोरांवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत व भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत देण्यात आले आहे.
सदर निवेदनावर न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष आसिफ शेख,उपाध्यक्ष दिपक छाजेड, सचिव परशुराम पोटे, लोकवाणीचे मुख्य संपादक राजु तुराणकर, विशाल ठोंबरे, दिगांबर चांदेकर,निलेश चौधरी, महादेव दोडके, द्ण्यानेश्वर बोनगीरवार,रविन्द्र कोटावार, पुरुषोत्तम नवघरे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.