Home बुलडाणा देऊळगाव मही येथील छत्रपती चौक अंधारा खाली;कोणी आहे का ह्या पथदिव्याचा वाली..?

देऊळगाव मही येथील छत्रपती चौक अंधारा खाली;कोणी आहे का ह्या पथदिव्याचा वाली..?

360

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:- देऊळगाव मही येथील छत्रपती चौक,(डीग्रस चौकातिल)पथदिवा गेल्या वर्ष भरापासून आहे त्याच अवास्तेत बंद पडून आहे.


शासन सोय सुविधा ह्या जनतेच्या हितासाठी असतात, ज्यामुळे जनतेला लाभ होतो परंतु चौकातील हा लाखो रुपयांचा पथदिवा आता शोभेची वस्तू बनला आहे.अनेक वेळा सदर प्रश्ना बाबत सामान्य जनतेतून आवाज उठला परन्तु तरी ही सदर पथदिवा सुरू होत नाही.
या पथदिव्या बाबत आता चौका चौकात चर्चा रंगत आहेत.
महामार्ग ठेकेदार बेकायदेशीर अरुंद रस्ता करून मोकळे झाले, त्यात देऊळगाव मही मद्ये एक दिवा लावून गेले असता तोही उभा केल्या पासून बंद अवस्तेत आहे.याबाबत ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव मही लोकप्रतिनिधी यांची अकार्यक्षमता आणि विकास कामा बाबत असलेली उदासीनता जनतेला दिसून येत आहे.
आणि त्यामुळे छत्रपती चौक अंधारा खाली, कोणी आहे का ह्या पथदिव्याचा वाली..? अशी म्हणायची वेळ आली आहे.
याबाबत आता देऊळगाव मही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी नेमकं काय भूमिका घेतात हे येणाऱ्या काळात कळेलच.