Home परभणी नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार...

नवीन डीपी चे ह भ प तुलसीदास महाराज देवकर यांच्या हस्ते होणार पूजन

298

गंगाखेड/ प्रतिनिधी

दीड वर्षापासून नादुरुस्त असलेला डीपी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आठ दिवसात मिळवला. या डीपी चे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी वाघलगाव येथे पूजन होणार आहे.

वाघलगाव येथील शेतकरी राम संभाजी अलनुरे यांच्या शेतातील वयक्तिक डीपी दीड वर्षापूर्वी जळाला. शेतकरी राम अलनुरे यांनी हा डीपी दुरुस्त करावा यासाठी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारल्या. पण या विषयाकडे कोणीच लक्ष देत नव्हते. शेतकऱ्यांने वघालगाव चे माजी सरपंच नारायण घनवटे यांच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधत हा डीपी मिळवून द्यावा यासाठी विनंती केली. सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे, जयदेव मिशे, नारायणराव धनवटे यांच्या सामूहिक प्रयत्नातून हा डीपी महावितरण अधिकारी मात्रे साहेब यांनी आठ दिवसात बदलून दिला. दीड वर्षापासून अंधारात राहत असलेल्या शेतकरी अलनुरे यांनी डीपी आल्याच्या आनंदात या डीपी चे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांच्या हस्ते पूजन करत या डीपी साठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्याचे ठरविले. त्या निमित्ताने मंगळवारी सकाळी दहा वाजता वाघलगाव शिवारत हा डीपी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे.