Home बुलडाणा जनसामान्यांतील असामान्य व्यक्तिमत्त्व गोपीनाथ मुंढे अन् कुशल प्रशासकही:- समाधान शिंगणे लोकनेता...

जनसामान्यांतील असामान्य व्यक्तिमत्त्व गोपीनाथ मुंढे अन् कुशल प्रशासकही:- समाधान शिंगणे लोकनेता प्रतिष्ठान च्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन..

148

लोकनेता प्रतिष्ठान च्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन..

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही :- स्व.गोपीनाथ मुंढे जयंती नीनिमित्त लोकनेता प्रतिष्ठान देऊळगाव मही यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी बोलतांना एखादा राजकारणी लोकनेता म्हणून ओळखला जात असेल तर तो प्रशासक म्हणून उत्तम नसतो, असे समजले जाते. परंतु, गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांमधील असामान्य व्यक्तिमत्त्व असण्याबरोबरच कुशल प्रशासकही होते. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून नेता कसा असावा याची जाणीव त्यांनी पावलोपावली करुन दिली,तसेच ते महाराष्ट्रा सह देशाचं नेतृत्व होतं असे प्रतिपादन राष्ट्रवादी नेते समाधान शिंगणे यांनी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना आपल्या मनोगता समाधान शिंगणे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पक्ष बांधणी ही सर्वसामान्य जनतेच्या संघटनातून होत असते. हे संघटन घडवून आणण्याची चिकाटी गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वात व कार्यात होती. त्यामुळेच त्यांची ओळख लोकनेते गोपीनाथ मुंढे अशी होत गेली. पक्षातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता यांना एकाच पातळीवर आणून संघर्ष व कष्टाच्या माध्यामातून पक्ष बांधणी व पक्ष संघटन वाढविणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून मुंढे यांची ओळख आज देखील होत असते. तसेच मुंढे यांनी पक्ष बांधणी व संघटन करताना ऊसतोड कामगार व मोलमजुरी करणाऱ्या जनतेला न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून लढा देणारे समाजकर्ते म्हणून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची ठरली आहे,’ असेही ते म्हणाले.यावेळी तेजराव मुंढे,पत्रकार आदील पठाण, डॉ सूरज बडे,कैलास राऊत यांनी मनोगत व्यक्त केले,
याप्रसंगी सरपंच रामा म्हस्के,डॉ ताठे,मन्नान पठाण, विश्वनाथ मुंढे, भगवानराव पालवे,श्रीमंत काळूसे,दीपक डोईफोडे, पत्रकार संतोष जाधव,अंभोरे सर,पुजाराम मगरे सर,,सुभाष आंधळे सर,दिलीप खिल्लारे, संजय खरात,डॉ स्वप्नील मुंढे, पत्रकार अमोल बोबडे,पत्रकार रवि आण्णा जाधव,लक्ष्मण आंधळे, संजय आंधळे,महेश नागरे, अमोल नागरे, रामेश्वर पालवे, विष्णू गीते, गणेश कुटे,गणेश जायभाये,विवेक डोईफोडे,अमोल मुंढे, बद्री नागरे,केशवराव कुटे,नाईक साहेब,गजाजन कुटे, रवी कुटे,जितेंद्र गवई यासह गावकरी मंडळी व लोकनेता प्रतिष्ठान सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघ यांनी तर आभार संजय आंधळे यांनी मानले.