Home बुलडाणा अखेर त्या दोघां नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

अखेर त्या दोघां नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

740

 

विवाहितेवर बलात्कार प्रकरण ,

हनिफ शेख

अंढेरा प्रतिनिधी , ता , देऊळगावराजा

बहिणीचा दिर व त्याचा मित्र या दोघांनी ओळखीचा गैरफायदा घेवून जबरसदस्तीने बलात्कार करुण जीवे मारण्याची धमकी दिली . अशा विवाहितेच्या तक्रारी वरुण १० डिसेंबर रोजी अंढेरा पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३७६ सह विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल केला आहे. मात्र आरोपी अद्यापही फरार झाले होते. त्यांना काल अटक करण्यात आली आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत
येणाऱ्या धोत्रा नंदई येथील एका ३५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केले की ,बहिणीचा दिर व त्याचा मित्र हे दोघे जण आमच्या घरी आले बहिणीचा दिर ओळखीचा असल्याने त्यांना पाहुचार केला आणि त्या रात्रीला दोघेही मुक्कामाला थाबले . रात्रीच्या वेळी पती हे मुलाला जेवणाचा डबा घेवून गेले हे पाहून बहिणीचा दिर दरवाजा बाहेर उभा राहिला आणि त्याच्या मित्राने घरात येवून पिण्याचे पाणी मागितले तेव्हा पाणी देत असतांना त्याने हात धरुन खाली दाबून जबरसदस्तीने आळीपाळीने दोघांनीही बलात्कार केला . आणि म्हटले की जर तू या बाबतीत सांगितले तर तुझ्या पतीला व मुलांना जीवे मारून टाकू अशी धमकी दिली . आशा विवाहितेच्या तक्रारी वरुण ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या आदेशानुसार बिट अंमलदार पोहेकॉ विलास काकड यांनी आरोपी ज्ञानेश्वर आसाराम कनखरे रा.आमगव्हाण ता. हादगाव जिल्हा नांदेड ,फकीरा किसनराव देशमुख, रा. उचेगाव ता. हदगाव जि.नांदेड यांच्या विरुद्ध 376.डि 506 अटक करण्यात आली आहे.पुढिल तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोज वासाडे.बीट अंमलदार विलास काकड रायटर किशोर जाधव यांनी काल दोन्ही आरोपीला नांदेड हिंगोली जिल्ह्यातुन अटक करून कारवाई करण्यात आली आहे.