Home उत्तर महाराष्ट्र पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करण्याबरोबरच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पत्रकार भवनाचा प्रश्न...

पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करण्याबरोबरच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावावा – शकीलभाईशेख 

619

अहमदनगर – सहा जानेवारी या पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्यासाठी आवश्यक असलेले पत्रकार भवन बनवण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पत्रकार भवनाचे प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा पत्रकार संरक्षण समितीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष शकीलभाई शेख यांनी व्यक्त केली आहे .चांगल्या समाजासाठी पत्रकारांचे मोठे योगदान राहिले आहे . हे राजकीय , सामाजिक पुढारी /नेते यांना माहीत आहे . 365 दिवस पत्रकार समाजासाठी देत असतात . समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी ,वाईट घटना , गुन्हेगारी , अन्याय-अत्याचार या घटनांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी , वाईट गोष्टी रोखण्यासाठी ते प्रयत्न करतात .सामाजिक बांधिलकी तसेच आपली जबाबदारी व कर्तव्य म्हणून काम करत असतात .समाजानेही त्यांना आपले समजून त्यांच्यासाठी आपलेही काही कर्तव्य व बांधिलकी आहे हे समजून ज्या ठिकाणी पत्रकारांसाठी पत्रकार भवन नाही त्या ठिकाणी पत्रकार भवन बनवण्यासाठी त्या-त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार , नगराध्यक्ष किंवा त्या ठिकाणचे सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष ,एखाद्या कारखान्याचे चेअरमन यांनी पुढाकार घेऊन पत्रकार भवनासाठी लक्ष घालून ते काम मार्गी लावावे . शहर तसेच ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार येतात . तेथील उपोषण , आंदोलन ,उद्घाटन , स्पर्धा , शालेय कार्यक्रम , पक्षाच्या पदाधिकारी यांच्या निवडी आदी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमास प्रसिद्धी देतात ते त्यांची सामाजिक जबाबदारी म्हणून काम करतात मात्र समाजातील लोक प्रतिनिधी पुढारी म्हणणाऱ्यांनी देखील या घटकाचा विचार करणे गरजेचे आहे . त्यांना उठण्या बसण्यासाठी , विचारविनिमय चर्चा , आपसात संवाद करण्यासाठी हक्काची जागा असावी यासाठी त्यांना पत्रकार भवनसाठी पुढाकार घेऊन शासकीय भूखंडावरील अथवा आरक्षित जागेवर राजकारणाच्या माध्यमातून चांगली प्रगती केलेल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावला तर त्यांना काम करण्यास आणखी उत्साह वाढेल . आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याच्या जाणिवेने ते समाजासाठी आणखी चांगल्या प्रकारे काम करू शकतील असे शेख यांनी म्हटले आहे .श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार भवनाचा प्रश्न सोडविण्याचे तेथील एका कारखान्याच्या माजी उपाध्यक्षांनी जाहीर केले आहे .याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील , प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पत्रकार भवन नसेल त्या त्या तालुक्याचे आमदार ,नगराध्यक्ष ,कारखान्याचे अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावला पाहिजे कारण पत्र कार हे तुमच्या , समाजाच्या हिताचे काम करीत असतात त्यांनी मागणी केली असेल किंवा नसली तरी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय भू- खंड , किंवा आरक्षित ठिकाण पाहून येत्या 6 जानेवारी रोजी असलेल्या पत्रकार दिनी पत्रकारांचा केवळ सन्मान न करता त्यांना पत्रकार भवन बांधुन देण्याची घोषणा करून त्यांना स्मरणीय भेट द्यावी .असे शेख यांनी सुचवले आहे .