Home अहमदनगर सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर यांचा म.लो.वसुंधरा समाजगौरव पुरस्काराने सन्मान !

सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर यांचा म.लो.वसुंधरा समाजगौरव पुरस्काराने सन्मान !

452

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील सामाजिक कार्यकर्ते विजय दत्तात्रय नगरकर यांचा नुकताच “वसुंधरा सेवाभावी संस्था इचलकरंजी (जि. कोल्हापूर)” यांच्यावतीने “महाराष्ट्र लोकरत्न वसुंधरा समाजगौरव पुरस्कार सन- २०२१” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.रविंद्र आरळी (संचालक : केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय महामंडळ (भारत सरकार),उद्घाटक प्रशांत देवकर (संचालक : झेड प्लस सुरक्षा सिक्युरिटी) तर सौ.सुनिता शेळके (उपसभापती : महिला व बालकल्याण, इचलकरंजी नगरपरिषद), सौ.ज्योती पाटील
(महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी),विजय माणगावे (कोल्हापूर जिल्हा ऑफिसर : ऍनिमल वेल्फेअर बोर्ड (भारत सरकार),राजू लायकर (निरिक्षक : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँके), अॅड.सूर्यकांत मिरजे
(विशेष सरकारी वकील),हविजय तोडकर (संपादक : साप्ताहिक वसुंधरा शक्ती)आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री.नगरकर यांना आपले आजोबा सामाजिक कार्यकर्ते स्व.डॉ.शिवराज नगरकर यांच्याकडून समाजसेवेचा वारसा लाभला आहे, स्व.डॉ.शिवराज नगरकर यांचे श्रीरामपूर शहर परिसरात मोठे सामाजिक योगदान आहे,तथा वडील डॉ.दत्तात्र्य नगरकर यांनी देखील तहहयाती आपल्या वैद्यकीय सेवेत पैसा न बघता रंजल्या- गांजल्या उपेक्षित घटकांची मोठी सेवा केली आहे,अशा समाज सेवेच्या संस्कारात वाढलेल्या श्री.विजय नगरकर यांचे देखील समाज कार्यात मोठे योगदान आहे, महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे ते विद्यमान संस्थापक अध्यक्ष,सोबतच श्रीस्वामी समर्थ सेवा ट्रस्ट आणि श्रीरामपूर मुद्रक संघाचे माजी अध्यक्ष तथा अनेक सेवाभावी संस्थेचे विविध असे पदे त्यांनी भुषविली आहे, समाजसेवेचा त्यांना वडिलोपार्जित वारसा लाभला असल्याने श्रीरामपूर शहराबरोबरच अहमदनगर जिल्हात त्यांचे देखील मोठे सामाजिक योगदान आहे,त्यांच्या अशा या निर्पेक्ष समाजसेवेची दखल घेऊन इचलकरंजी जि.कोल्हापूर येथील वसुंधरा सामाजिक सेवा भावी संस्थेच्यावतीने “महाराष्ट्र लोकरत्न वसुंधरा समाजगौरव पुरस्कार सन- २०२१” या पुरस्काराने त्यांना सपत्निक गौरविण्यात आले.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे,
श्रीरामपूरचे आमदार लहूजी कानडे,नगराध्यक्षा अनुराधाताई आदीक,उपनगराध्यक्ष करणदादा ससाणे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे,स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे माणिकराव जाधव,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख,
सामाजिक कार्यकर्ते शुभम केणेकर संदिप कदम, नवनाथ कर्डीले, रामपाल पांडे, रणजित श्रीगोड, संजय जोशी, अशोक उपाध्ये, सुनील कुलकर्णी, संपादक शौकत नाईकवाडी, रियाजभाई शेख, रमेश जेठे (सर)अनिल कोळसे,नरेंद्र लचके,अल्ताफ शेख, बाळासाहेब जाधव,असलम बिनसाद, इम्रान पटेल,राहुल कोळगे,किरण बोरुडे,अमोल शिरसाठ, जावेदभाई शेख,इस्त्याक शेख,आदींनी अभिनंदन केले आहे.