यवतमाळ – भारतातील काही सरकारी शाळा यांचा नावलौकिक देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे त्याची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते.ते म्हणजे दिल्ली येथील सरकारी शाळा.नगर पालिकेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीकोणातून दिल्ली येथील मॉडेल स्कुल मध्ये झालेले शैक्षणिक बदल अभ्यासण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष मा.अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वात शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन दिनांक 20.12.2021 ते 24.12.2021 दरम्यान केलेले आहेत.या दौऱ्यात महाराष्ट्रातील 82 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे.यामध्ये यवतमाळ नगरपालिकेतून संजय नारायण चुनारकर व डॉ.विनोद सुर्यभान डवले या शिक्षकांची निवड करण्यात आली.
त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.दिल्लीच्या शाळा ह्या भारतातील सर्वात चांगल्या दर्जाच्या सरकारी शाळा आहेत.शैक्षणिक दौऱ्यामध्ये त्या शाळेत झालेले शैक्षणिक बदल अभ्यासण्यात येणार आहेत.दिल्ली येथील डायटमध्ये एक दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा होणार आहे.तशाच शाळा यवतमाळ येथे बनविण्याच्या प्रयत्न करणार आहे.सदर दौऱ्याकरिता नगराध्यक्षा मा.कांचनताई चौधरी, मा.मुख्याधिकारी माधुरी मडावी मॅडम,प्रशासन अधिकारी निता गावंडे यांनी अभ्यासदौऱ्यासाठी संजय चुनारकर व डॉ.विनोद डवले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.