➡️ पारवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा..!
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळी (सदोबा) दूरक्षेत्र मधील आर्णी तालुक्यातील गुढा येथील टेकडी जवळ विशाल दत्ता आगीरकर (वय – 28) रा. राणी धानोरा (ता. आर्णी) हा युवक व कु. पुनम संजय राऊत (वय – 18) रा. बोंडगव्हाण (ता. माहूर) ह्या दोघांनी 15 डिसेंबरचे रात्री ते 16 डिसेंबरचे सकाळ दरम्यान विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केलेली आहे. सदर आत्महत्या प्रकरणी गुढा येथील पोलीस पाटील नितीन खोडे यांनी पारवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पारवा पोलीसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गजानन शेजूलकार, पोलीस हवालदार सूरेश येलपूलवार आदीं करत आहे.