Home मराठवाडा शेतकऱ्यांनी फळबागांना जास्तीत जास्त विमा संरक्षण कवच घ्यावे – योगेश परिवार

शेतकऱ्यांनी फळबागांना जास्तीत जास्त विमा संरक्षण कवच घ्यावे – योगेश परिवार

1055

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – मागील वर्षी मोसंबी व डाळिंबाचा विमा हवामान धोक्याचे निकष बदलल्यामुळे नामंजूर झाल्याने या वर्षी शेतकरी विमा भरणा करण्याकडे पाठ फिरवत आहेत.बदलत्या हवामानामुळे शासनाने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता आता ट्रिगर मध्ये शेतकरी हिताचे बदल केले आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेत जास्तीत जास्त फळबागांना विमा संरक्षण कवच घ्यावे असे आवाहन एचडीएफसी एर्गो विमा कंपनी चे स्टेट हेड योगेश परिहार यांनी केले आहे.


अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १६ डिसेंबर बुधवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित फळबाग विमाधारक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व मार्गदर्शन चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते.
डाळिंब फळपिकाचा १४ जानेवारी २०२२ तर आंबा बागांचा ३१ डिसेंबर पर्यंत विमा भरून घ्यावा. जेणे करून हवामान धोक्यामुळे आपले आर्थिक नुकसान होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी आपल्या फळबागा विमा संरक्षित घ्यावे असे आवाहन कंपनी प्रतिनिधी सर्कल हेड बाळासाहेब गोपाळ यांनी केले. तसेच त्यांनी फळबाग शेतकऱ्यांना फळपीक विमा भरणा ते विमा मंजुरी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अंतरवाली सराटीचे उपसरपंच भागवत तारख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,सचिव पांडुरंग गटकळ, युवानेते विष्णू नाझरकर,विध्यार्थी परिषदेचे गणेश गावडे, आबासाहेब वाघमारे, कानिफनाथ सावंत,दीपक नांद्रे,संतोष शास्त्री,संतोष उधे,डिगंबर तारख,राजेंद्र तारख,अशोक तारख,विश्वबर तारख,शुभम चाबुकस्वार विमा कंपनीचे रिजनल मॅनेजर निलेश देवकर, प्रतिनिधी कृष्णा किवणे,आरिफ शेख, आदींची उपस्थिती होती.