➡️ जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई..!
अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, दिनांक 17/12/2021 रोजी 11.00 वाजता पुसद शहर येथे गोर सेनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश महामोर्चा दरम्यान अतिसंवेदनशिल पुसद शहर व परीसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे (यवतमाळ) यांनी ग्रामीण व शहरी भागामध्ये जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले असुन कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलने, मोर्चा ईत्यादी आयोजनास प्रतिबंध करण्यात आले आहे.
🔵➡️ सदर प्रतिबंधात्मक आदेशाव्दारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा काढलेल्या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्ती विरूध्द भारतिय दंड संहिता कलम १८८ अन्वये शिक्षा पात्र असलेला अपराध मानुन कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
🔵➡️ तरी पारवा व ईतर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, दिनांक 17/12/2021 रोजी गोर सेनेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश महामोर्चास प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नाही. सदरचा आक्रोश महामोर्चा संपुर्णपणे बेकायदेशिर असुन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पारीत केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारा आहे. तरी पारवा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही नागरीकांनी सदर आक्रोश महामोर्चामध्ये सहभाग घेवु नये, अन्यथा त्यांचे विरूध्द कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले आहे.