जलगाँव: ( एजाज़ शाह)
इकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम कॉलेज चे प्राचार्य डॉ. सय्यद शुजात अली यांच्या सेवा पूर्ती गौरव निमित्त इकरा एचजे थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथे एक”अफसांनवी नशिशस्त” चे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी डॉ.अब्दुल करीम सालार साहेब होते. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.इकबाल शाह साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अब्दुल मजीद सेठ झकेरिया, प्रा.जफर शेख, अब्दुल रशीद शेख, डॉ.ताहीर, अब्दुल अजीज सालार, तारिक शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच जफर पिंच, डॉ. नूरुल हसनैन,( औरंगाबाद) डॉ. नूरुल अमीन, (परभणी) डॉ. अजीम राही,(परभणी) डॉ.अझीम राही ( परभणी) खिझर अहमद शरर (परभणी), तसेच ग्यास अहमद उस्मानी, मोईनुद्दीन उस्मानी, मुश्ताक करीमी, वहीद इमाम अन्सारी,( सर्व जळगाव) वसीम अकील शाह (मुंबई) यांनी आपले कथन मांडले आणि आपल्या कथनाने उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी डॉ.सय्यद शुजात अली साहब यांनीही आपली कादंबरी सादर करून सर्वांची वाह वा मिळवली. डॉ.अब्दुल करीम सालार यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वकार शेख व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी एजाज-उद-दीन कबीर-उद्दीन शेख यांनी अतिशय व्यापक पद्धतीने लोकांचे मनोरंजन केले. समारंभाच्या शेवटी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा डॉ.चांद खान यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालया चे उप प्राचार्य प्रा.पिंजारी, डॉ.युसूफ पटेल व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ.हारून बशीर, जमीर अश्रफ, शेख गुलाब व इकरा संस्थेच्या विविध संस्थांचे कर्मचारी यांनीही या कार्यक्रमा मध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.