Home विदर्भ सावळी – सदोबा येथे डोळे तपासणी शिबिरात 700 च्या वर रुग्णांनी लाभ...

सावळी – सदोबा येथे डोळे तपासणी शिबिरात 700 च्या वर रुग्णांनी लाभ घेतला..!

150

➡️ डोळे तपासणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद..?

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी / यवतमाळ – आर्णी तालुक्यातील शहीद ज्ञानेश्वर आडे बहुउद्देशीय संस्था, कृष्णनगर द्वारा आयोजित सावळी सदोबा येथे दि. 18 डिसेंबर 2021 रोजी मोफत डोळ्यांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सावळी सदोबा परिसरातील जवळपास 700 च्या वर रुग्णांनी डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी करून घेतली. तपासणीत 125 रुग्णांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले.
या 125 रुग्णांच्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येईल असे, आयोजक वीरपत्नी कुंतीताई ज्ञानेश्वर आडे, नुनेश्वर गोविंदा आडे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी सांगितले.
🟣 डोळ्याच्या रुग्णांना त्यांच्या घरापासून यवतमाळला नेण्याची व डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी आयोजकांनी घेतली आहे. डोळे तपासणी शिबिरात वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाचे नेत्र तज्ञ डॉ. उमेर तयबानी, डॉ. गिरीराज होडगिरे, डॉ. निलेश आंबेकर, डॉ. शुभम बाकमवार, डॉ. सोहम गायधने यांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. आर्णीचे नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. रामभाऊ वाघाडे यांनी या वेळी मोलाचे सहकार्य केले.
🟣 शिबिरात आलेल्या बहुतेक रुग्णांना डोळ्यांचे औषध, गोळ्या मोफत देण्यात आल्या असून
शिबिरा दरम्यान येणाऱ्या सर्व रुग्णांसाठी मोफत मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षापासून सावळी सदोबा व परिसरात मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले नव्हते, हे येथे उल्लेखनीय. आजच्या मोफत डोळे तपासणी शिबिरामुळे अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. या डोळे तपासणी शिबिराच्या निमित्ताने रूग्णांनी आयोजकांचे आभार मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी किसन नाईक, उमाकांत आडे, सनम तंवर, ईदंरसिंग चव्हाण, वसंता नारायण जाधव, दुलसिंग नाईक चव्हाण, ईदंल महाराज, संतोष पवार, मधुकर राठोड, विजय राठोड, रवी राठोड, अविनाश चव्हाण, संदेश तोवर, मोहन चव्हाण, शंकर जाधव, विरू राठोड, अक्षय राठोड, राजे जाधव, अमोल जाधव, माँटी जाधव, चेतन चव्हाण आदींनी अथक परिश्रम घेतले.