श्रीरामपूर (शौकतभाई शेख) –
शाळा हे व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र असून मुलांना फुलासारखे जपा पण खेळ,व्यायाम आणि संवाद कौशल्यात कणखर बनवा असे मत श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. जीवन बोरसे यांनी व्यक्त केले. येथील महादेव मळ्यातील अँड. रावसाहेब शिंदे संचालित विद्यानिकेतन प्री.प्रायमरी इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये आयोजित स्पोर्ट डे निमित्त झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून जीवन बोरसे बोलत होते.अध्यक्षस्थानी अॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते.प्रमुख उपस्थिती म्हणून साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रा.शिवाजीराव बारगळ, सौ.विशाखा बोरसे,प्राचार्य सूरडकर,स्पोर्ट टीचर सुनील आहेर, व्यासपीठावर उपस्थित होते.प्राचार्य सूरडकर यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.स्पर्धक विद्यार्थी, विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शशिकलाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, उपकार्याध्यक्ष डॉ. प्रेरणा शिंदे यांनी स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उपक्रमास शुभेच्छा दिल्या सहायक पोलिस
निरीक्षक बोरसे यांनी मुलांना हसत खेळत संवाद साधत शाळेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले.अशा गुणवत्तापूर्ण शाळेत आपल्या पाल्यास प्रवेश मिळाला याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.डॉ बाबुराव उपाध्ये यांनी अॅड, रावसाहेब शिंदे यांच्या विचार आणि कार्याचा आदर्श जपत ही शाळा शिक्षण क्षेत्रात गतिशील आहे असे सांगून खेळ आणि शिक्षण हे जीवन विकासाचे डोळे आहेत ते सतत जपले पाहिजे, प्राचार्य शेळके यांच्यासारख्या सेवाभावी, अनुभवी आणि अड, रावसाहेब शिंदे यांच्या विचारांची जपवणूक करणारे चेअरमन लाभले आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला. प्राचार्य शेळके आणि प्रा.बारगळ यांनी मुलांचे कौतुक केले.सुनील आहेर यांनी खेळ आणि शाळा उपक्रमाची माहिती दिली. सनी पंडित, प्रीती राठी, सोनाली बनभेरू यांनी संयोजनात भाग घेतला. कोऑर्डिनेटर जया फरगडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.