Home परभणी राजकारणातील घाण साफ करण्याच काम महिलांनी करावं- सीमाताई धनवटे

राजकारणातील घाण साफ करण्याच काम महिलांनी करावं- सीमाताई धनवटे

125

गंगाखेड – गाडगे बाबा यांनी गावा गावातील घाण साफ केली. घर व अंगण साफ करण्याचा अनुभव असलेल्या महिलांनी ओबीसीला आरक्षणाला विरोध करणारी राजकारणातील घाण साफ केल्याशिवाय आरक्षण पूर्ववत होणार नाही असा विश्वास ओबीसी नेत्या, माजी सरपंच सीमाताई घनवटे यांनी आंदोलनस्थळी नवव्या दिवशी सोमवारी बोलताना व्यक्त केला.

धरणे आंदोलनाच्या नवव्या दिवशी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन स्थळी संत गाडगेबाबा, माता भिमाई पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सिमाताई घनवटे, माजी नगरसेविका वर्षाताई यादव , सूर्यमाला मोतीपवळे, गुणाज भाभी, आशा रेघाटे, गोविंद यादव, सखाराम बोबडे पडेगावकर,नारायण धनवटे ,मुंजाभाऊ लांडे बाळासाहेब सूर्यवंशी, रोहिदास लांडगे यांनी महापुरुषांना अभिवादन केले.
ओबीसी आरक्षणा साठी महिला स्वतः आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्याने आंदोलनाची ताकद आणखी वाढली असल्याची भावना परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.