नाशिक – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची अखंडित १४९ वी दुर्गसंवर्धन मोहीम (दि १९ डिसेंबर २०२१)रोजी दुर्ग रामशेजवर झाली.या मोहिमेत सहभागी दुर्गसंवर्धकांनी दिवसभराच्या श्रमदानातून किल्ल्याच्या माथ्यावरील सैनिकांचे दोन जोते काटेरी झुडपांतून मुक्त केले.त्यात अस्ताव्यस्त पडलेले दगड त्याच ठिकाणी संकलित केले,व जोत्यात लावलेल्या चाफ्याच्या झाडांना आळे करून त्यांना पाणी घालण्यात आले.
शिवकार्य गडकोट संस्थेच्या माध्यमातून दुर्ग रामशेजवर ऐतिहाशिक महत्व असलेले एकूण १८ सैनिकांचे जोते,१ चुन्याचा घाना,१ दारुगोळा कोठार,सरदाराचा माचीवर भग्न वाडा,१८ पाणथळ(टाके) आहेत. त्यांच्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने,माती व दगडात व झुडपांत ते लुप्त झाले आहेत.त्यात अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमेतून या आधीच १८ पाण्याचे टाके तळापासून गाळ,कचरा काढून स्वच्छ करण्यात आले आहेत तर दारुगोळा कोठार,चुन्याचा घाणा,दगड, माती व झुडुपे काढून मुक्त करण्यात आला आहे.आज रविवारच्या मोहिमेत दोन सैनिकांचे जोते झुडपातून व दगडातून स्वच्छ करून त्यातील रोपांना पाणी घालण्यात आले.यावेळी दुपारच्या प्रहरी किल्ल्यावर दुर्ग-संवाद झाला यावेळी दुर्गसंवर्धन विषयावर राम खुर्दळ यांनी तर दुर्ग वाचवा विषयावर मांडणी करतांना वनविभाग,राज्यपुरातत्व विभाग,महसूल यंत्रणा व स्थानिक गाव व सामाजिक दुर्लक्षामूळ दुर्ग दुर्लक्षित पडझडीत अखेरची घटका मोजत आहे, या स्थितीत दुर्गांच्या अस्तित्वासाठी जीवापाड अभ्यासात्मक राबणाऱ्या दुर्गसंवर्धन संस्थांना शासकीय खाते,व राज्य सरकार सातत्याने बेदखल करीत आहे,मात्र त्यागाच्या भावनेतून ही शिवशंभुची मूळ स्मारके आम्ही दुर्गसंवर्धक वाचवण्यासाठी श्रमत आहोत.यावेळी “जेव्हा गड बोलू लागला”एकपात्री फेम संकेत नेवकर यांनी कलात्मक भाषेत मोहिमेची मांडणी वर्णन केले.व समस्त शिवभक्तांना किल्ल्यांकडे बघा,ते वाचवा त्यासाठी योगदान करा असा संदेश दिला.यावेळी मोहिमेत शिवकार्य गडकोट संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,श्रमदान समिती टीमचे भूषण औटे,रोहित गटकळ,प्रचार प्रसार प्रमुख संकेत नेवकर,सोमनाथ जाधव,विकास बोडके,बाळू बोडके,संकेत बोडके,जयराम बदादे,चंद्रभान नारळे,मिनानाथ बेंडकोळी,सोमनाथ बेंडकोळी,सचिन चौधरी यासह अनेक दुर्गसंवर्धक सहभागी झाले होते, दरम्यान रामशेजवर सातत्याने किल्ल्यावर व्यावसायिकांच्या व पर्यटकांच्या बेपर्वाई मूळ वाढलेलं प्लास्टिक वेचत सायंकाळी पुढील (आगामी) दुर्ग वाघेरा(चक्रधर)किल्ल्याच्या मोहिमेची तारीख ठरवून मोहिमेची सांगता केली.
Post Views: 243