(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामदास राठोड तर, उपाध्यक्षपदी सौ. वंदना आत्राम यांची एकमताने निवड करण्यात आली. बुधवारी जिल्हा परिषद मराठी शाळा भांबोरा येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अध्यक्षपदी रामदास राठोड तर, उपाध्यक्षपदी सौ. वंदना आत्राम यांची एकमताने निवड करण्यात आली.
या प्रसंगी सर्व पालक व सदस्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. या वेळी संतोष पवार, गणेश राठोड, सुनीता वसंता काळे, सपना प्रमोद आसुटकर, मंजुश्री उमरे, मुख्याध्यापक वांडरे सर व शिक्षक वृंद हजर होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास राठोड यांनी आपल्या निवडीचे श्रेय काँग्रेस नेते तथा घाटंजी पंचायत समितीचे माजी सदस्य सहदेव राठोड यांना दिले.