प्रतिनिधी -: धनराज खर्चान
अमरावती /भातकुली -: दि.२०दिसे रोजी हरिभक्त गुरुवर्य वैराग्यमूर्ती रंगराव महाराज टापरे यांचे आज अमरावती येथे निधन झाले त्याच्या निधनामुळे पंढरीचा एक निष्टावंत वारकरी हरपला असल्याची भावना व्यक्त करीत अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या शोकभावना प्रकट केल्या आहेत.
रंगराव महाराज टापरे यांच्या अंत्यविधी समयी पालकमंत्री आवर्जून उपस्थित होत्या. ह. भ.प.गुरुवर्य रंगराव महाराज टापरे अकोला जिल्हातील आखतवाडा येथील रहिवासी होते गेल्या अनेक वर्षापासून कौडण्यापूर धामाचे ते निष्ठावंत वारकरी म्हणून कार्यरत होते .
रंगराव महाराजाचे वारकरी संप्रदायामध्ये मोठे योगदान आहे कौडण्यापूर धामामध्ये वारकरी संप्रदाय याचा प्रचार करण्यात आणि आध्यात्मिक ज्ञान आणि पंढरपूर प्रति असलेली अखंड निष्ठा पाहता त्यांना वैराग्यमूर्ती म्हणून मानले जात असे , रंगराव महाराज यांच्या जाण्याने समाजाचे आणि आध्यात्मिक वर्गाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या स्मृती नेहमी जागवल्या जातील असे उदगार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी बोलताना काढले.