Home मराठवाडा मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या गुंतवणूकदारांना गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कडून सकारात्मक दिलासा

मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या गुंतवणूकदारांना गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कडून सकारात्मक दिलासा

2111

जालना – लक्ष्मण बिलोरे

मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या गुंतवणूकदारांना गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून सकारात्मक दिलासा मिळाला असून लवकरच परतावे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले आहे.


२१ डिसेंबर २०२१ रोजी मंत्रालयात या संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती.मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या गुंतवणूकदारांना योग्य त्या नियमानुसार परतावा मिळण्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस महासंचालक,अप्पर पोलिस महासंचालक आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा मुंबई, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, जिल्हाधिकारी नाशिक,सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मुंबई ,एमपीआयडी मुंबई यांच्या सोबत मंत्रालय मुंबई येथे गृहमंत्र्यांच्या दालनात मंगळवारी बैठक पार पडली.याप्रसंगी डॉ जीएन हरपनहळ्ळी,यासिनसय्यद, गंगाधर तोडकर, नानासाहेब पाटील, रामराव मोरे, विष्णु संकपाळ,उषा पाटील,शिल्पा बिडकर,माणिकताई माळी,शिल्पा गुंड, रत्नमाला नाईक, रेहाना सयद, सुप्रिया तोडकर यांच्यासह राज्यातील मैत्रेय ठेवीदार व एजंंटांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.या वेळी मैत्रेय परतावा देण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाल्याने गुंतवणूकदार, एजंट यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.