Home जळगाव कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा २३मुलिंची सुटका ११ महिलांवर गुन्हा दाखल

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा २३मुलिंची सुटका ११ महिलांवर गुन्हा दाखल

244

चोपडा:(एजाज़ गुलाब शाह)

शहरातील एका परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून २३ तरुणींची सुटका केली असून यात ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल २३ तरूणींची सुटका करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांच्या पथकाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.
यात जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल २३ तरूणी आढळून आलेत. सर्व तरूणींचे सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणात कुंटनखाना चालविणाऱ्या ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले. या परीसरात मध्यप्रदेश, आंध्रा, पश्चिम बंगाल, कलकत्तासह नेपाळमधील तरूणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार केल्या जात आहे. वारंवार कारवाया होऊन सुद्धा या परिसरात देह व्यापार केली जात होती.