कोरोना प्रतिबंधक नियमांचे
पालन करावे ; संजय सातव
शिर्डी (शौकतभाई शेख ) –
आंतरराष्ट्रीय किर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी शहरात श्रीसाईबाबांजींच्या दर्शनासाठी असंख्य साईभक्त येत आहे, नाताळ सण त्यावर सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी होत असल्याने या गर्दीचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठी दक्षता घेत येथील पोलिस कुमक आणखी वाढविली आहे. श्रीक्षेत्र शिर्डी शहरात श्रीसाईबाबांजींच्या दर्शनासाठी देश – विदेशातून साईभक्त येत असतात, शिर्डी हे देशातील सुप्रसिद्ध तीर्थस्थान असून साईभक्तांना दर्शनासाठी साई मंदिर खुले झाल्यानंतर दिवसेंदिवस मोठी गर्दी वाढत आहे. त्यात २५ डिसेंबर ,नाताळ सुट्ट्या,नवीन वर्षाचे स्वागत, यामुळे शिर्डीमध्ये साईभक्तांची मोठी गर्दी होत आहे,या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये शहरासाठी पोलीस कुमक वाढवण्यात आली असून १ पोलीस निरीक्षक,१० पोलीस उपनिरीक्षक ,२७ महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह ९५ पोलीस कर्मचारी शिर्डीसाठी स्वतंत्रपणे देण्यात आले आहे,
शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या गर्दीमुळे येथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच गर्दीमुळे येथील पाकीटमारी चेंन स्नेकिंग,छोट्या मोठ्या चोर्या होऊ नये यासाठी येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच २७ डिसेंबर नंतर आणखी पोलीस दलाची कुमक येथे दाखल होणार आहे.कोरोनाच्या अटी व शर्तींचे पालन व्हावे, नागरिकांनी साईभक्तांनी मास्क वापरावे, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे, विनाकारण गर्दी करु नये,कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस द्यावे,त्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे,शासनाच्या आदेशाचे तथा कोरोना प्रतिबंधक अटी आणि शर्तींचे कोणी उल्लंघन केल्यास कायद्याच्या तरतुदीनुसार दंड आणि कारवाई करण्यात येईल असा इशाराही शिर्डीचे पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.