घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
आईच्या निधनानंतर तेराव्याचा नेम पार पडला आईच्या निधनाचा बहूदा विरह सहन झाला नसावा पाठोपाठ मुलाचेही निधन झाल्याने जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील धांडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
११ डिसेंबर २०२१ रोजी रामसगाव येथील शकुंतला रामकृष्ण धांडे पाटील यांचे निधन झाले.त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. आप्तस्वकियांनी भेटी दिल्या तेरावा करण्यात आला .त्यानंतर २४ डिसेंबर रोजी पहाटे मयत शकुंतलाबाई राधाकृष्ण धांडे यांचा मुलगा शिवाजी राधाकृष्णा धांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले अंत्यविधी आटोपला.परंतु मायलेकराच्या एकापाठोपाठ निधनाने रामसगावातील धांडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.स्व.शकुंतलाबाई यांच्या पश्चात एकुलता एक मुलगा,सून, मुली,पुतणे तसेच शिवाजी रामकृष्ण धांडे यांच्या पश्चात चार मुली जावई एक मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे.शिवाजी धांडे हे माऊली धांडे यांचे वडील होत.