मनिष गुडधे – अमरावती
नागपूरचे रहिवासी असलेले हे कुटुंबीय शुक्रवारी युगांडा येथून नागपूर विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात माय-लेक ओमायक्रॉन संशयित आढळून आले. मात्र, तिघांनीही विमानतळावर क्वारंटाईन न होता २५ डिसेंबर रोजी एका राजकीय व्यक्तीच्या सल्ल्याने अमरावती गाठले.
नागपूर येथील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस या तिघांचा शोध घेत त्यांनी दिलेल्या हनुमान मंदिर, डेली निडस्, नागपूर या पत्त्यावर पाेहोचले. ते तेथे नव्हतेच. मोबाईल क्रमांकासुद्धा बंद होता. अखेर पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस केले. ते तिघेही अमरावती येथे दाखल झाल्याचे शनिवारी उशिरा रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले पोलीस, आरोग्य यंत्रणेने घेतला शोधनागपूर येथील विमानतळावर ओमायक्रॉन संशयितांनी क्वारंटाईन न होता एका राजकीय व्यक्तीच्या पाठबळावर अमरावती गाठले.
त्यांना पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या चमूने शनिवारी उशिरा रात्री शोधून काढले. त्यानंतर सुपर स्पेशालिटीत उपचारासाठी दाखल केले. यात नागपूर येथील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस चमूने माेलाची भूमिका बजावली.युगांडातून आलेले माय-लेक नागपूर विमानतळावरील तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांचा अमरावतीत शोध घेतला व सुपर स्पेशालिटीत भरती केले. संपर्कातील तिसऱ्यावरही लक्ष आहे.
सुपर स्पेशालिटीत स्वतंत्र कक्षात उपचारयुगांडा येथून आलेल्या तिघांपैकी माय-लेक ओमायक्रॉनचे संशयित रुग्ण आहेत. वडील निगेटिव्ह आले आहेत. तथापि, त्यांच्या संपर्कात असल्याने त्यालाही सुपर स्पेशालिटीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. येथे डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.नमुने पुन्हा पाठविले तपासणीसाठीयुगांडा व्हाया नागपूर ते अमरावती असा प्रवास करणाऱ्या कुटुंबातील तिघांचेही ओमायक्रॉन, कोरोनाची चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नमुने घेतले. हे नमुने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आता या नमुन्यांच्या अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.