Home बुलडाणा लोकशाही मराठी पत्रकार संघ बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी ‘आदील पठाण’ यांची निवड..!

लोकशाही मराठी पत्रकार संघ बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी ‘आदील पठाण’ यांची निवड..!

199

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:- तालुक्यात आपल्या सामाजिक कार्याने,समाज प्रबोधन व आपल्या निर्भीड लिखाणाने वेगळी ओळख बनवणारे पत्रकार संपादक आदील पठाण यांची लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.चिखली येथील नियोजित बैठकित अध्यक्षांच्या हस्ते सदर निवड करण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करत संघटने च्या ध्येय धोरणांच्या आधीन राहून ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न, समस्या सोडवण्या बरोबरच आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टी ने मी प्रयत्न करणार असल्याचे आदील पठाण यांनी सांगितले.याप्रसंगी लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले,प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटील,संग्राम पाटील,दशरथ सुरडकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष,प्रविणजी तायडे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष,विजय खरात, जिल्हा अध्यक्ष जालना,प्रशांत डोंगरदिवे जिल्हा अध्यक्ष बुलडाणा,
प्रशांतजी जैवाळ जिल्हा संपर्क प्रमुख,प्रविणकुमार काकडे जिल्हा उपाध्यक्ष,अमोल हरणे, काळे सर ,राजेंद्र ससाने जिल्हा सचिव व संदिप सावळे पाटील तालुका अध्यक्ष यांच्या सह लोकशाही पत्रकार संघाच्या सर्व टीम ने जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल आदील पठाण यांचे अभिनंदन केले.
यावेळी चिखली तालुका, देऊळगाव राजा,जाफराबाद, भोकरदन, सिल्लोड,मेहकर, सह इतर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.