Home विदर्भ घाटंजी येथे राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्य जनजागृती अभियान..!

घाटंजी येथे राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्य जनजागृती अभियान..!

300

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी शाखेतर्फे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय यांचे सयुक्त विद्यमाने
राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त ग्राहक जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शासनातर्फे ग्राहक कायद्यातील दुरुस्तीच्या तरतुदीं बाबत चर्चा करण्यात आली. तसेच सहाय्यक आयुक्त पुणे यांनी काढलेल्या पत्रकावर चर्चा करण्यात आली. यात हॉटेल व इतर दुकानातील खाद्य पदार्थ न्यूज पेपरच्या रद्दी मध्ये बांधून देत असतात त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. पेपर छपाईची शाई केमिकल पासून तयार केली असते ते केमिकल आरोग्यास घातक असतात. त्यामुळे पेपर मध्ये गरम खाद्य पदार्थ जनतेस देणे धोकादायक ठरत आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्रधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी 6 डिसेंबर 2016 पासून हा आदेश निर्गमित केला आहे. त्याचे पालन होत नाही.
यासाठी अन्न व औषध सहाय्यक, आयक्त पुणे यांनी 21 डिसेंबर 2021रोजीचे परिपत्रक काढून छोटे दुकानदार, छोटे मोठे – हाँटेल, बेकरीची दुकाने, स्वीट मार्ट, चाट, वडापाव, भेल आदीं न्यूज पेपरच्या कागदावर खाद्य पदार्थ देवू नये. अन्यथा सबंधित दुकानदारावर कडक कार्यवाही करण्यात येइल, असे आदेश निर्गमित केले आहे. ग्राहकांनी सुद्धा जागृत राहुन प्लेटची मागणी करावयास पाहीजे. यावेळी
घाटंजी शहरातील रस्ते जनतेला चालण्या साठी उपलब्ध झाले पाहीजे. मुख्य रस्त्यावर शाळा असल्याने त्या रस्त्यावरील वाहने, हातगाडी यांना शिस्त लावली पाहीजे, रस्त्यावरुन व फुटपाथ वरुन जनतेच्या चालण्याचा हक्क मिळाला पाहीजे, रस्ते मोकळे झाले पाहीजे इत्यादि विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी घाटंजी तालुका ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा अँड. अनुपमा दाते, उपाध्यक्ष प्रभाकर बोमिडवार, सचिव प्रशांत उगले तसेच नायब तहसीलदार माला गेडाम मैडम, वाघाडे बाबु, देशपांडे बाबू, पुरवठा निरिक्षक वाघ मॅडम, पुरवठा विभागाच्या गादेवार मॅडम आदीं मान्यवर उपस्थित होते.