Home मराठवाडा शिवनगाव येथील पंजाबराव तौर यांना पत्नीशोक ,कविताच्या निधनाने धक्का…

शिवनगाव येथील पंजाबराव तौर यांना पत्नीशोक ,कविताच्या निधनाने धक्का…

918

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

शहरातील सेवन व्हील परिसरातील रहिवाशी आणि बिल्डर तथा क्रेडाई संघटनेचे सरचिटणीस पंजाबराव तौर यांच्या पत्नी कविता तौर (वय ४३) यांचे २८ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता निधन झाले. त्यांच्यावर बीडबाय पास मार्गावरील कमलनैन बजाज रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दोन मुले, एक दिर, जाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
कविता तौर या जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील रहिवाशी होत्या.त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथील MGM हॉस्पिटल जवळील जकात नाका येथील स्मशानभूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या जालना येथील कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक बदामराव तौर यांच्या त्या वहिनी होत.