रवींद्र साखरे आष्टी
वर्धा – आष्टीचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांना 9 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक करण्यात आली, ही कारवाई रात्री उशिरापर्यंत चालली.
आष्टी तालुक्यातील खंबीत येथील शेतकरी राहुल भिवापुरे यांनी सबसिडीवर जयश्री मोटर्स यांच्याकडून 7 लाख 20 हजाराचा ट्रॅक्टर खरेदी केली. तालुका कृषी कार्यलयाकडून शेतकऱ्याला यावर 1 लाख 20 हजाराची सबसिडी मिळते त्यासाठी कृषी विभागाच्या कागदपत्रे करण्यात आली.. याकरिता प्रभारी कृषी अधिकारी सिद्धप्पा नागप्पा नडगेरी यांनी सबसिडी काढण्यासाठी शेतकऱ्याला 15 हजाराची मागणी केली यात शेतकऱ्यांने तडजोड करून 9 हजार रुपये देण्याचे ठरले.
शेतकऱ्याला लाचची रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी वर्धा येथील लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्रीमती सुहासनी सहस्त्रबुद्धे यांनी तक्रारीवरून गोपनीयसापळा रचून शेतकऱ्यांकडून खंबीत गावात प्रभारी तालुका कृषी अधिकारी याने 9 हजाराची लाच स्वीकारली या प्रकरणात सिध्दप्पा नडगेरी यांना रंगेहाथ अटक केली. पोलीस स्टेशन आष्टी येथे भ्रष्टाचार
कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहासनी सहस्त्रबुद्धे ,पोलीस हवालदार रोशन निंबाळकर,सागर वैद्य, कैलास वालदे, प्रदीप कुचनकर, अर्पणा मिरझापुरे यांनी ही कारवाई केली.