मुलांच्या संघाने पटकावले सुवर्ण पदक तर मुलींने कांस्यपदक
यवतमाळच्या अक्षय बानोरे व गौरी सायरेची उल्लेखनीय कामगिरी
यवतमाळ – साॅफ्टबाॅल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या द्वारा आयोजित ४३ वी वरिष्ठ राष्ट्रीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धा आंध्रप्रदेश अनंतपूर येथे २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत महाराष्ट्र संघासह भारतातील ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र मुलांच्या संघाने महाअंतिम सामन्यात आंध्रप्रदेश चा ६-१ असा पराभव करत पहिल्यांदाच विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर मुलींच्या संघाने सेमिफायनल मध्ये केरळ सोबत पराभूत होऊन आपले कांस्यपदक निश्चित केले.
संघासोबत राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, मिलिंद दर्प, संदीप लंबे, ऐश्वर्या भास्करन होते. यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने उत्कृष्ठ कामगिरी करून जो विजय मिळवला, त्याचा अभिमान असल्याचे महाराष्ट्र राज्य साॅफ्टबाॅल असोसिएशन चे सचिव डॉ प्रदीप तळवलकर यांनी सांगितले. व दोन्ही संघांच्या खेळाडुंना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी यवतमाळ जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशन चे सचिव प्रा डॉ विकास टोणे सर सुद्धा उपस्थित होते. या स्पर्धेत पंचप्रमुख म्हणुन महाराष्ट्र मधील मुकुल देशपांडे यांची निवड झाली होती. त्यांच्यासोबत सहकारी पंच म्हणुन सुजय कल्पेकर व विकास वानखेडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वरिष्ठ मुलांचा चा संघ
चेतन महाडीक(कर्णधार), जयेश मोरे( उपकर्णधार), सुमेध तळवलकर, कल्पेश कोल्हे, प्रितीश पाटील, गौरव चौधरी, दिपक खंडारे, हर्षद जमालकर, सौरभ टोकसे, प्रथमेश वाघ, अभिषेक सेलोकार, अक्षय बानोरे, स्वप्निल गदादे, सुरज गायकवाड, विष्णू जाधव, राजेश भट, अजय चव्हाण, गणेश
प्रशिक्षक :-राज्य क्रिडा मार्गदर्शक किशोर चौधरी, मिलिंद दर्प
संघ व्यवस्थापक :- संदीप लंब
वरिष्ठ मुलींचा संघ
ऐश्वर्या पुरी(कर्णधार), स्वप्नाली वायदांडे(उपकर्णधार), करिश्मा कुडाचे, ऐश्वर्या बोडके, प्रीती कांबळे, हर्षदा कासार, प्रिया सुर्यवंशी, निधी खंबलकर, ज्योती पवार, सुश्मिता पाटील, शिवानी देशमुख, उर्वशी सनेश्वर, नेहा देशमुख, सई जोशी, मोनाली नातू, गौरी सायरे, सायली खोट, रहनुमा शेख
प्रशिक्षक:- मिलिंद दर्प, संदीप लंबे
संघ व्यवस्थापक :- ऐश्वर्या भास्करन