Home जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे डोळ्यांचे शिबिर संपन्न

कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे डोळ्यांचे शिबिर संपन्न

401

रावेर (शेख शरीफ)

रावेर येथे आज दि. २८ डिसेंबर मंगळवार रोजी यावेळी
कांताई नेत्रालयाच्या वतीने ७० रुग्णाची तपासणी करुण १४ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

कांताई नेत्रालयचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करुन माहिती दिली.
कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात चिकित्सक विजय कसबे ,व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी ७० शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी १४ रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगांव येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला पाठविण्यात आले.
कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भाजपा मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष दिलीप लहासे, (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील आबा पवार ड्राव्हर नरेन्द्र महाजन, तुषार महाजन,आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.