Home विदर्भ धक्कादायक  पोटे महाविद्यालयात रंगरंगोटी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

धक्कादायक  पोटे महाविद्यालयात रंगरंगोटी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

176

मनिष गुडधे अमरावती

अमरावती शहरामधील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या पि. आर. पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनल सोसायटीमध्ये रंगरंगोटी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे.या चारही कर्मचाऱ्यांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये हलविण्यात आले असून घटनास्थळी गाडगे नगर पोलीसांचा मोठा ताफा पोहचलेला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. कालच अमरावती शहरामधील डॉ. अग्रवाल यांच्या दवाखान्यानजिक मेडीकलला लागलेल्या आगीची घटना घडली होती, सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. अशामध्येच पोटे महाविद्यालयाजवळ घडलेल्या या घटनेने संपुर्ण समाजमव हळहळले आहे.