रावेर (शेख शरीफ)
1 नोव्हम्बर च्या नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने पेन्शन बंद केले आहे. परंतु 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासकीय सेवेत असताना सुद्धा महाराष्ट्रातील अनेक शिक्षक जुन्या पेन्शन योजनेच्या हक्कापासून वंचित आहेत. 2005 पूर्वीची च्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती द्वारा अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. यावेळी हिवाळी अधिवेशनात आपली मागणी सक्षमपणे मांडण्याकरिता लोकशाही पद्धतीने जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती चे अध्यक्ष श्रीमती संगीता ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिक्षक-शिक्षिका बंधू-भगीनी आझाद मैदान मुंबई येथे आठवडाभरा पासून महा विश्वास धरणे आंदोलन करत आहेत.
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी धरणे आंदोलनात हजेरी लावली व जुनि पेन्शन समन्वय समितीच्या अध्यक्षा श्रीमती संगीता ताई शिंदे यांना आयटा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सय्यद शरीफ सर यांनी जाहीर पाठिंबा चे पत्र दिले.
यावेळी ईशु कमिटी चे महाराष्ट्र राज्य कन्विनर पठाण शरीफ खान,आयटा पालघर चे जिल्हा अध्यक्ष तन्वीर अहेमद,व अक्रम खान उपस्थित होते.