रावेर (शेख शरीफ)
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष मा . दिपक सुर्यवंशीयांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व भाजपच्या कार्यकर्त्या सना जहांगीर खान यांची अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्याजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे . त्यांना नुकतेच शहराचे आमदार व जिल्हाध्यक्ष ग्रामीण मा . सुरेश भोळे ( राजूमामा ) आणि जळगाव जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्तेनियुक्ती पत्र देण्यात आले . सना जहांगीर खान ह्या मुक्ताईनगर तालुक्यापासून ते जळगाव जिल्ह्यापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवल . त्या १ ९९ ३ पासून भारतीय जनता पार्टीच्या सदस्या आहेत . २०१२ ते २०१४ पर्यंत जिल्हा चिटणीस , २०१४ ते २०२० जिल्हा उपाध्यक्षा , अल्पसंख्यांक सेवा संघजिल्हा अध्यक्ष , मायनोरीटी एजुकेशन वेल्फेअर सोसायटी अध्यक्षा , महिला विकास फौंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत . महिलांच्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात . सना खान या सतत भाजपाशी निगडीत असून पक्षाचे मोर्चे , आंदोलने , कार्यक्रम बैठकांमध्ये अग्रेसर असतात . त्यांना देण्यात आलेल्या जबाबदारी बद्दल माजी मंत्री आ . गिरीशभाऊ महाजन , उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्रीरवीजी अनासपुरे , आ.सुरेश भोळे ( राजु मामा ) , जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी मा.खा.रक्षाताई खडसे , मा.खा.उन्मेष दादा पाटील , मा.आ. चंदू भाई पटेल माजी आमदार स्मिताताई वाघ , जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील , महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे , महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे , रेखाताई पाटील , अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अँड शहबाज शेख , अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष आरिफ शेख , साबीर ( गुड्डो पठाण , उपाध्यक्ष मोहमद शेख , अल्पसंख्यांक युवा मोर्चा अशफाक शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .