Home मराठवाडा तुकाराम राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद जालना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

तुकाराम राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद जालना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

311

जालना- लक्ष्मण बिलोरे

जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथील रहिवासी असलेले व मागील पाच ते दहा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेले व्यक्तिमत्त्व तुकाराम हरिश्चंद्र राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद जालना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती राष्ट्रीय बंजारा परिषद अध्यक्ष किसनराव राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.राष्‍ट्रीय बंजारा परिषद अध्यक्ष किसनराव राठोड हे बंजारा जोडो अभियान निमित्त ते मराठवाडा दौऱ्यावर असताना ते जालना तसेच मंठा येथे आले होते.यावेळी प्रमुख उपस्थिती- महंत जितेंद्र महाराज(पोहरादेवी),विलास राठोड(राष्ट्रीय उपाध्यक्ष),पि.टी.चव्हाण(राष्ट्रीय महासचिव),डॉ.मोहन चव्हाण(प्रदेशाध्यक्ष),पंडित राठोड (युवा उद्योजक),विजय राठोड(सभापती बुलढाणा),कृष्णा चव्हाण(जिल्हा अध्यक्ष बुलढाणा),शाम राठोड (जिल्हा अध्यक्ष जालना),बाबुराव शाहीर,विशाल राठोड,गजानन चव्हाण,मुकेश राठोड आदी मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.